आमच्याबद्दल

द मराठी बाणाची गोष्ट ...

बँकेतली सुरक्षित नोकरी सोडून इतिहास सांगायचा निर्णय सोपा नव्हता. पण महाराष्ट्राच्या गडकोटांमध्ये, संतांच्या अभंगांमध्ये आणि जुन्या कागदपत्रांमध्ये दडलेल्या गोष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत - या एका विचारातून "द मराठी बाणा" सुरू झाले.

आज लाखांहून अधिक प्रेक्षकांचा हा परिवार मराठा साम्राज्याचा इतिहास, वारकरी संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आणि चालू घडामोडी यांवरचे सखोल व्हिडिओ पाहतो. आमचा नियम एकच - दंतकथा नव्हे, तर पुराव्यांवर आधारित इतिहास; आणि तोही मनाला भिडेल अशा पद्धतीने.

संस्थापक

रणजीत रमेश यादव 1

रणजीत रमेश यादव

रणजीत यादव हे कोल्हापूरचे. B.E. (Mechanical) झाल्यानंतर त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये सुमारे १० वर्षे व्यवस्थापक म्हणून काम केले. इतिहासाची ओढ त्यांना पूर्णवेळ इतिहासकथनाकडे घेऊन आली. आग्र्यातील "शोध शिवरायांचा" सारखे प्रत्यक्ष ठिकाणांवरचे माहितीपट, पन्हाळा हेरिटेज वॉक आणि "अजिंक्य ताराराणी" हे पुस्तक ही त्यांची ओळख. महाराष्ट्राचा इतिहास आणि वारकरी परंपरेशी नाळ जोडलेले रणजीत प्रत्येक व्हिडिओचा शेवट करतात -

"मी आहे रणजीत यादव आणि तुम्ही पाहत आहात - द मराठी बाणा."

दृष्टी

मराठी माणसाला आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभिमान वाटेल असे, जगातील सर्वात विश्वासार्ह मराठी इतिहास व्यासपीठ उभे करणे.

ध्येय

  • मूळ कागदपत्रे आणि संदर्भांवर आधारित इतिहास सोप्या मराठीत पोहोचवणे.
  • गडकोट, वारसा स्थळे आणि संत परंपरा प्रत्यक्ष ठिकाणांवरून दाखवणे.
  • विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजीत दर्जेदार, अभ्यासपूर्ण पुस्तके उपलब्ध करून देणे.
  • दंतकथा आणि इतिहास यातला फरक प्रामाणिकपणे मांडणे.

आमची मूल्ये

सत्य आणि संदर्भ
सोपी भाषा
मातीशी नाळ
नव्या पिढीसाठी इतिहास

पुरस्कार आणि सन्मान

पुरस्कार 1पुरस्कार 2